एक पोस्ट तिच्या आठवणीतला.............. जीव भरुन पहावे तुला एकदा....

जीव भरुन पहावे तुला एकदा
                                                     ---------- मंगेश पाडगावकर.
जीव भरुन पहावे तुला एकदा
रानाच्या बरगड्यातून पळस पेटताना.

पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्या
शुभ्र शुभ्र कळ्या होताना.

जीव भरुन पहावे तुला एकदा
अनिवार हाक प्राणात भरुन:

मोर अंधाराचा थुईथुई भिजताना
पिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन.

जीव भरुन पहावे तुला एकदा
कळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी;

काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणे
मिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी.

जीव भरुन पहावे तुला एकदा.
जीव भरुन तुझे व्हावे एकदा.........

Comments

Popular posts from this blog

I AM ALWAYS THERE FOR YOU !

Tell Me Why

Being Uncommon

माझं गाव : कोकण