आठवण

भेटत....
ती पण नाही,

भेटत...
मी पण नाही....

निभवणे तिला जमत
नाही,
आशेवर ठेवण मला
पटत नाही.

फसवत
ती पण नाही,

फसवत
मी पण नाही....

तिला रुसण्याचे दु:
आहे,
मला एकटेपणाची
भीती आहे....

समजत...
ती पण नाही,

रागवत.....
मी पण नाही......

कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी

बघत...
ती पण नाही,

थांबत...
मी पण नाही....

जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....

ऐकत..
ती पण नाही,

सांगत..
मी पण नाही....

पण एक गोष्ट मात्र
खरी आहे,
प्रेम माझे आजही
आहे तिच्यावर

नाकारत ..
ती पण नाही,

सांगत...
मी पण नाही.......

Comments

Popular posts from this blog

I AM ALWAYS THERE FOR YOU !

Tell Me Why

Being Uncommon

माझं गाव : कोकण