भेट
किती प्रगल्भ व्याप्ती आहे ' भेट ' या शब्दाची ! खरंच , खूपच अर्थपूर्ण . कोण ? कुणाला ? कुठे ? केव्हा ? कशाला ? ' भेटेल ' आणि का ? ' भेट णार नाही ' ह्याला ' प्रारब्ध ' म्हणावं लागेल . ' भेट ' ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन . ' भेट ' कधी ' थेट ' असते , कधी ती ' गळा भेट ' असते , कधी 'Meeting' असते , कधी नुसतंच 'Greeting' असते . ' भेट ' कधी ' वस्तू ' असते प्रेमाखातर दिलेली . ' भेट ' कधी ' देणगी ' असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली . ' भेट ' कधी ' उपरोधक ' असते ... ' वर भेटू नका ' म्हणून सुनावलेली . ' भेट ' थोरा -...