भेट



किती प्रगल्भ व्याप्ती आहे 'भेटया शब्दाची !
खरंचखूपच अर्थपूर्ण.
               
कोणकुणालाकुठेकेव्हा?
कशाला? 'भेटेल'

आणि

का? 'भेटणार नाही'

ह्याला 'प्रारब्धम्हणावं लागेल.
'भेटह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.

'भेटकधी 'थेटअसते,
कधी ती 'गळाभेटअसते,
कधी 'Meeting' असते,
कधी नुसतंच 'Greeting' असते.

'भेटकधी 'वस्तूअसते प्रेमाखातर दिलेली.
'भेटकधी 'देणगीअसते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.

'भेटकधी 'उपरोधकअसते...
'वर भेटू नकाम्हणून सुनावलेली.

'भेटथोरा-मोठ्यांची असते,
इतिहासाच्या पानात मिरवते.
'भेटदोन बाल-मित्रांची असते...
फार वर्षांनी भेटल्यावर,
पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.

'भेटकधी अवघडलेली,
'झकमारल्यासारखी.
'भेटकधी मनमोकळी,
मनसोक्त मैफिल रंगवलेली.

'भेटकधी गुलदस्त्यातली,
कट-कारस्थान रचण्यासाठी.
'भेटकधी जाहीरपणे,
खुलं आव्हान देण्यासाठी.

'भेटकधी पहिलीवहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
'भेटकधी अखेरची ठरते.
मनाला चुटपूट लावून जाते.

'भेटकधी अपुरी भासते,
...बरंच काही राहून गेल्यासारखी.
'भेटकधी कंटाळवाणी,
घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.

'भेटकधी चुकून घडते,
...पण आयुष्यभर पुरून उरते.
'भेटकधी 'संधीअसते,
निसटून पुढे निघून जाते.

'भेटकोवळ्या प्रेमिकांची.
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.
'भेटघटस्फोटितांचीही असते.
...हक्क सांगण्यासाठी मुलांवर.

'भेटएखादी आठवणीतली असते.
मस्त 'Nostalgic' करते.
'भेटनकोशी भूतकाळातली.
.....सर्रकन अंगावर काटा आणते.

'भेट'...
विधिलिखीत...काळाशी  टाळता येण्याजोगी !

'भेट'...
कधीतरी आपलीच आपल्याशी.
अंतरातल्या स्वत:शी.
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.

 पुन्हा भेटू...! कधीतरी !

Comments

Popular posts from this blog

I AM ALWAYS THERE FOR YOU !

Tell Me Why

Being Uncommon

माझं गाव : कोकण